Belagavi

चिन्नम्मा वृध्दाश्रमाला एम. जी. हिरेमठ यांची भेट

Share

बेळगावातील श्री नागनुर शिव बसवेश्वर ट्रस्टच्या श्रीमती चींन्नमा बि हिरेमठ वृद्धाश्रमाला मावळते जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी रविवारी सपत्नीक भेट देऊन आजीआजोबांच्या समवेत वेळ घालविला.

सकाळी सहाच्या सुमारास त्यांनी वृद्धाश्रमाला भेट दिली. तसेच आजी  आणि आजोबा समवेत अल्पोपहार केला. सदर अल्पोपहाराचे नियोजन एमजी हिरेमठ यांनी  स्व खर्चातून केले.

यावेळी त्यांनी या मातृदिनी आजी-आजोबांना शाल  आणि पुष्पहार देऊन त्यांना मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना हिरेमठ यांनी, कोणत्याही वेळेस, कशाचीही मदत भासल्यास मी सदैव तत्पर आपल्या सेवेत हजर राहीन, तसेच अधून मधून वृद्धाश्रमाला भेट देईन अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. कोणतीही सरकारी मदत न घेता वृद्धाश्रम चालविणाऱ्या नागनूर स्वामीजींच्या समाजसेवेचे त्यांनी कौतुक केले. यावेळी वृध्दाश्रमाचे संयोजक एम. एस. चौगला, दलित नेते व सामाजिक कार्यकर्ते मल्लेश चौगुले ,सिद्धप्पा कांबळे, वार्ड 48 चे नगरसेवक बसवराज मोदगेकर, सिद्धप्पा कांबळे, सामाजिक कार्यकर्ते राजू कलेकन्नावर, तट्टे  ईडली हॉटेलचे मालक शांती कुमार यांच्यासह अन्य उपस्थित होते

 

Tags: