Belagavi

शिवजयंती गाड्यावर नृताच्या तालावर डान्स करतेवेळी मागून हल्ला केल्याने 5 युवक जखमी

Share

शिवजयंती चित्र मिरवणुके वेळी नृताच्या तालावर गल्लीतील युवक डान्स करतेवेळी दोन वेगवेगळ्या मंडळाच्या ठिकाणी चाकू व बाटली हल्ला करून पाच जण जखमी झाल्याची घटना बुधवारी रात्री गवळी गल्ली व भांदूर गल्ली या ठिकाणी घडली.

अनिकेत महादेव गवळी (वय 22) अभिषेक महादेव गवळी (वय 25) दोघेही रा. गवळी गल्ली हे दोघेही भाऊ गवळी गल्लीच्या चित्ररथावर डान्स करतेवेळी काही ग्रामीण भागातून आलेल्या युवकांनी या दोघांच्या वर मागून चाकूहल्ला केल्याने जखमी झाले आहेत तर प्रशांत गोपाळ आडाव (वय 27) स्वप्निल लक्ष्मण बेळगावकर (वय 17) मनोहर प्रवीण तेजम (वय 23) तिघेही रा. पाटील मळा हेही गाड्यावर नृत्य करतेवेळी शेजारील गल्लीतील काही युवकांनी मागून डोक्यात बियर वाटल्याने वार करून तिघाजणांना जखमी करण्यात आले आहे.
या सर्व जखमींवर जिल्हा इस्पितळात दाखल करून उपचार करण्यात आला आहे.

Tags: