Belagavi

आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; नितेश पाटील बेळगावचे जिल्हाधिकारी

Share

बेळगावचे जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांच्यासह राज्यातील १७ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश सरकारने बजावला आहे.

होय, बेळगावचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्यासह राज्यातील १७ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश सरकारने आज बजावला. बृहत बेंगळूर महापालिकेचे आयुक्त गौरव गुप्ता, बेळगावचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्यासह अनेक आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. महसूल विभागाने याबाबतचा आदेश आज बजावला.

बेळगावचे जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांची केआरआयडीएल, बंगळूरच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी बेळगावचे जिल्हाधिकारी म्हणून धारवाडचे विद्यमान जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांचे सचिव पोन्नराज यांची ग्रामविकास खात्याचे सचिव म्हणून, टी. के. अनिलकुमार यांची महसूल खात्याच्या मुख्य सचिवपदी, मनोज पै यांची कामगार खात्याच्या सचिवपदी, खुश चौधरी यांची कर्नाटक भवनचे उपायुक्तपदी, डॉ. राजेंद्र के. यांची कर्नाटक लोकसेवा आयोगाच्या सचिवपदी, गुरुदेव हेगडे यांची धारवाडच्या जिल्हाधिकारीपदी, भोपालन यांची बागलकोट जिल्हाधिकारी पदी, प्रसन्न एच. यांची उडुपी जिल्हा पंचायत सीईओपदी, गिरीश दिलीप बडोली यांची कलबुर्गी जिल्हा पंचायत सीईओपदी बदली केल्याचा आदेश सरकारने आज बजावला आहे.

दरम्यान, आज, गुरुवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात मावळते जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी नूतन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना अधिकार सूत्रे स्वीकारली.

Tags: