COVID-19

पंतप्रधान बैठक : डॉ. के. सुधाकर यांनी दिले स्पष्टीकरण व्हिडीओ कॉन्फरन्सअंतर्गत मुख्यमंत्र्यांनी घेतला सहभाग

Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची कोविड संदर्भात व्हिडीओ कॉन्फरन्स बोलाविली होती. या कॉन्फरन्सला कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई मंगळुरु मधून सहभागी होणार होते. मात्र अचानक मंगळुरु दौरा रद्द झाल्याने मुख्यमंत्र्यांनी गृहकचेरीतूनच सहभाग घेतला, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. के सुधाकर यांनी दिली.

कोविड च्या चौथ्या लाटेसंदर्भात चर्चा करण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आपल्या कृष्णा या गृहकार्यालयातून सहभाग घेतला. हि बठक महत्वाची असल्याकारणाने मंगुरु चा दौरा रद्द करण्यात आला. या बैठकीत मुख्यमंत्र्यांसमवेत आपणदेखील उपस्थित होतो.

तसेच या बैठकीत परदेशातील कोविड परिस्थितीचा आढावा याचबरोबर आपल्या राज्याची स्थिती, परिस्थिती आणि तयारी यासंदर्भात विचारविनिमय करण्यात आला. या बैठकीत उपयुक्त सल्ला सूचना देण्यात आल्या अशी माहिती डॉ. के सुधाकर यांनी दिली.

डॉ. के ..सुधाकर पुढे म्हणाले, काळ भारत सरकारने एक चांगला निर्णय घेतला आहे. ६ वर्षांवरील मुलांना लस देण्याचा निर्णय घेण्यात आला असून हि लस प्रत्येक वयोगटातील व्यक्तीला मिळाल्याने या रोगावर नियंत्रण मिळविणे सोपे जाईल. ६० वर्षांवरील नागरिकांना हि लस मोफत देण्यात येत असून १८ वर्ष पूर्ण असलेल्या व्यक्तींनी लसीचा ६ महिन्यांचा कालावधी पूर्ण केला असल्यास बूस्टर डोस घ्यावा, बूस्टर डोस उपलबध असल्याचे डॉ. के .सुधाकर म्हणाले.

काही कोविड वॉरियर्सना कामावरून कमी करण्यात आले आहे. मात्र आता कंत्राटी तत्वावर अनेकांना कामावर घेण्यात येत असून ६ ते १८ महिन्यांच्या कालावधीसाठी हे कंत्राट असल्याचे ते म्हणाले. गेल्या ६ महिन्यात कोविड रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने १८ महिन्यांचे कंत्राट संपलेल्या कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आले असून वित्तविभागाच्या आदेशानुसार आणखी ६ महिन्यांचा विधी वाढवून देण्यात आल्याचे डॉ. के. सुधाकर यांनी सांगितले.

Tags: