गणेशोत्सवात मिरवणूक मार्गावर कुठलाही अडथळा येऊ नये, यासाठी हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसह मंगळवारी सकाळी बेळगावातील विविध भागातील मंडप उभारणी जागेची व मिरवणूक मार्गाची पाहणी केली.

बेळगाव महानगरपालिकेत सोमवारी सायंकाळी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या अध्यक्षतेखाली गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीची बैठक झाली होती. या बैठकीत लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव व सुनील जाधव यांनी मिरवणूक मार्गावर लोंबकळत असलेल्या विद्युुत तारा, झाडांच्या फांद्या आदींबाबत सूचना मांडल्या होत्या. मंडळ पदाधिकार्यांच्या या सूचनांचा विचार करून याबाबत हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी आज शहरातील श्री मिरवणूक मार्गाची पाहणी केली.

19 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या कालावधीत कोणतीही विद्युुत समस्या किंवा अडचण निर्माण होऊ नये, यासाठी मंगळवारी हेस्कॉमच्या प्रशासनाने नियोजनाची दिशा ठरवली.
हेस्कॉमचे मुख्य अभियंता सुनील कुमार, बेळगाव उत्तरचे अभियंता अश्विन शिंदे तसेच, विद्युुत वितरण, कर्मचारी व लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळाचे पदाधिकारी यांसह मंडळ पदाधिकार्यांच्या उपस्थित गणेशोत्सव मिरवणूक मार्गावर पाहणी दौरा करण्यात आला
यावेळी लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव, उपाध्यक्ष गिरीश धोंगडी, प्रवीण पाटील, अजित जाधव, सेक्रेटरी हेमंत हावळ, उप सेक्रेटरी सुनील जाधव, अर्जुन रजपूत, रवी कलघटगी, नितीन जाधव, गजानन हंगीरगेकर, अरुण पाटील आदि उपस्थित होते.


Recent Comments