COVID-19

कोरोनाच्या चौथ्या लाटेची हुलकावणी! पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलाविली आढावा बैठक

Share

देशातील काही भागांमध्ये वाढणाऱ्या कोरोना रूग्ण संख्येच्या पार्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली.

देशभरात पुन्हा एकदा कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असल्याचे निदर्शनास येत असून या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलाविलेल्या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, आरोग्यमंत्री डॉ. के सुधाकर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता.

सर्व पात्र मुलांचे लसीकरण लवकरात लवकर करणे हे सरकारचे प्राधान्य असून त्यासाठी शाळांमध्ये विशेष कार्यक्रम राबवावे लागतील. तसेच साथीच्या रोगाशी संबंधित आव्हान अद्याप पूर्ण झाले नसल्यामुळे सर्व अधिकाऱ्यांनी सतर्क राहण्याची गरज आहे, कोविड संकटाचे व्यवस्थापन करूनही, इतर देशांच्या तुलनेत, देशातील काही राज्यांमध्ये कोरोनाची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे आपल्या सर्वांना सतर्क राहण्याचे गरजेचे असल्याचे मोदींनी यावेळी स्पष्ट केले.

शास्त्रज्ञ आणि तज्ञ मंडळींकडून कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येनंतर राष्ट्रीय आणि जागतिक परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, त्यांच्या सूचनांवर आपल्याला काम करणे आवश्यक आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी कोरोना नियमांचे प्रत्येकाने काटेकोरपणे पालन करणेदेखील आवश्यक असल्याचे मोदी म्हणाले. देशातील 96 टक्के प्रौढ लोकसंख्येला कोविड लसीचा किमान एक डोस मिळाला आहे असे म्हणत ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब असल्याचे मोदी यांनी यावेळी सांगितले. तर 15 वर्षांवरील वयाच्या पात्र लोकसंख्येपैकी 85% लोकांना कोविड-19 लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. तसेच केंद्र आणि राज्यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे आरोग्याच्या पायाभूत सुविधांमध्ये बरीच सुधारणा सांगत, मोदींनी वैद्यकीय महाविद्यालये आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये समान मनुष्यबळ वाढवण्याचे आवाहन केले.

चौथ्या लाटेचा संभाव्य धोका सध्या तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात असून जागतिक आरोग्य संघटना वेळोवेळी नव्या व्हेरिएंट संदर्भात सूचना आणि सल्ले जारी करत आहे. नागरिकांनी आपली सुरक्षितता जपावी यासाठी मास्क आणि योग्य ती खबरदारी घावी, असे आवाहन देखील पंतप्रधानांनी केले आहे.

Tags: