कर्जाला कंटाळून विणकरांनी आत्महत्या करण्याचे सत्र बेळगावात सुरुच आहे. ज्ञानेश्वर नगर वडगाव येथील आणखी एका विणकराने याच कारणावरून गुरुवारी आत्महत्या केली.

गणेश कृष्णाप्पा तावरे, वय ३७ असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. गुरुवारी सकाळी त्याने ज्ञानेश्वर नगर, वडगाव येथील राहत्या घरी बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना निदर्शनास आल्यावर शहापूर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. त्यानंतर शहापूर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला.

त्यानंतर अंत्यसंस्कारासाठी गणेशचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. गणेशने घेतलेल्या कर्जाची परतफेड होत नव्हती. त्यामुळे मनस्तापातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. सध्या विणकर व्यवसायावर संकट आले आहे. त्यामुळे कर्जाच्या बोज्याखाली अनेक विणकर आत्महत्येचा मार्ग पत्करत आहेत, ही चिंतेची बाब ठरली आहे.


Recent Comments