बेळगावातील काँग्रेस रस्त्यावर पार्क केलेल्या इनोव्हा कारच्या काचा फोडून लॅपटॉप व अन्य किंमती वस्तू चोरणाऱ्या तिघा चोरट्यांच्या टिळकवाडी पोलिसांनी दोनच दिवसात मुसक्या आवळल्या आहेत.

डॉ. अनिल पाटील यांनी टिळकवाडीतील काँग्रेस रोडवरील पॉलीक्लिनिकसमोर आपली इनोव्हा कार उभी केली होती. तिची काच फोडून कारमधील लॅपटॉप, ३ मोबाईल, ३ घड्याळे, १ पेनड्राइव्ह आणि ६,९३० रुपये रोख रक्कम या तिघांनी चोरली होती. या ऐवजाची एकूण किंमत ७९ हजार ५०० रुपये होते.

याचा वेगाने तपास करत टिळकवाडी पोलिसांनी तिघा चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत. हे तिघेही मूळचे तामिळनाडूचे आहेत. अरुणकुमार उमानाथ (वय २४), उमानाथ राधाकृष्ण (वय ५०) आणि एकंबरब कातरन (वय ४५) अशी अटक केलेल्या चोरट्यांनी नावे आहेत. त्यांनी बेळगाव परिसरात आणखी कुठे चोऱ्या केल्या आहेत का याची चौकशी करण्यात येत आहे.


Recent Comments