Gokak

कंत्राटदार संतोष पाटील आत्महत्या प्रकरणी नवा ट्विस्ट

Share

४० टक्के कमिशन प्रकरणी कंत्राटदार संतोष पाटील यांनी केलेल्या आत्महत्येनंतर अनेक प्रकारच्या माहिती समोर आल्या असून या प्रकरणी आता एक नवा ट्विस्ट उजेडात आला आहे. याप्रकरणी माजी मंत्री आणि विद्यमान आमदार रमेश जारकीहोळी यांची बेळगावमधील १२ कंत्राटदारांनी भेट घेतली आहे.

४० टक्के कमिशन मागितल्याप्रकरणी सुरु झालेल्या नाट्यात कंत्राटदार संतोष पाटील यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. यानंतर या प्रकरणात अनेक प्रकारची माहिती उघड झाली असून संतोष पाटील यांनी केलेल्या कामातील १२ कंत्राटदारांनी गोकाक येथे रमेश जारकीहोळी यांची भेट घेऊन चर्चा केली आहे.

गोकाक येथे रमेश जारकीहोळी यांच्याशी चर्चा केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राजू जाधव म्हणाले, ग्राम पंचायत अध्यक्ष आणि संतोष पाटील यांनी आपल्याला कामकाज करण्याची सूचना दिली होती. यासाठी लागणारी वर्क ऑर्डर आपल्याकडे असून काम सुरु करण्याचेही त्यांनी सांगितले होते. त्यावेळी गावची लक्ष्मी देवी यात्रा भरली होती. जत्रा सुरु होण्यापूर्वी सर्व कामकाज पूर्ण करण्याचे सांगण्यात आले होते. यानुसार आपण संपूर्ण कामकाज पूर्ण केले. यासंदर्भात आपण ईश्वरप्पांची भेट घेतली नाही. तसेच या विकासकामांसाठी संतोष पाटील यांनी पैसे गुंतविले नव्हते. हे कामकाज आपण केल्याचे त्यांनी सांगितले. मात्र हिंडलगा व्याप्तीतील कलमेश्वर नगर येथील २७ लाख रुपयांची विकासकामे केली असून अजूनही १२ जण तेथे काम करत आहेत. या कामाचे पैसे संतोष पाटील यांनी दिले नसून आपण दिले आहेत. असे राजू जाधव यांनी सांगितले.

मृत संतोष पाटील यांच्या आत्महत्येनंतर नवनवी माहिती उजेडात येत असून आज गोकाक मध्ये रमेश जारकीहोळींची भेट घेण्यासाठी गेलेल्या १२ जणांच्या समूहाने आणखी एक माहित पुढे आणली आहे. मंत्री के एस ईश्वरप्पा यांच्यावर केलेल्या आरोपानंतर हि सारी माहिती उजेडात आली असून आता या प्रकरणाचा शेवट कशापद्धतीने होतो याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Tags: