Belagavi

बेळगावच्या वर्दळीच्या चन्नम्मा चौकात ‘बर्निंग कार’चा थरार

Share

 धावत्या कारने अचानक पेट घेतल्याची घटना बेळगावातील वर्दळीच्या चन्नम्मा चौकात सोमवारी सकाळी घडली.

सोमवारी सकाळी चन्नम्मा चौकात नेहमीप्रमाणे वाहनांची वर्दळ सुरु असतानाच अचानक एका चालत्या कारमध्ये आग लागल्याची घटना घडली. यावेळी कारचालकाने लागलीच कार थांबवून बाहेर धाव घेतली. एका सहकारी पतसंस्थेत नोकरी करणारे विशाल पाटील यांच्या मालकीची ही कार असल्याचे समजते.

यावेळी चौकात बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी अग्निशामक दलाला पाचारण केले. त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. खडेबाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून पोलीस तपास सुरू आहे.

 

Tags: