बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील हिरेबागेवाडी येथील श्री पडीबसवेश्वर देवस्थानच्या नूतन गोदामाच्या कामाला विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी भूमिपूजन करून चालना दिली.

हिरेबागेवाडी येथील श्री पडीबसवेश्वर देवस्थानच्या नूतन गोदामाच्या कामाला शनिवारी सायंकाळी गुढीपाडव्यानिमित्त प्रारंभ करण्यात आला. विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी भूमिपूजन करून या कामाला चालना दिली. या कामासाठी सरकारकडून १५ लाख रुपये अनुदान मंजूर झाले आहे. गावातील प्रमुख, देवस्थान समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत या कामाचे भूमिपूजन पार पडले.

यावेळी सी. सी. पाटील, अडिवेश इटगी, बी. एन. पाटील, सुरेश इटगी, बसू तोटगी, उळवेप्पा रोट्टी, बी. आर. पाटील, यलगौडा पाटील, बसनगौडा पाटील, रघु पाटील, सी. बी. शिंत्री, राजू शेट्टी, दानगौडा पाटील, उमेश कंठी, अप्पनगौडा जारीगौडर, रुद्रगौडा पाटील, विशाल हिरेमठ, अज्जाप्पा मठपती, मंजू वालीइटगी, बसवराज हंचीनमणी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ उपस्थित होते.


Recent Comments