Belagavi

चन्नराज हट्टीहोळी यांच्याहस्ते क्रिकेट स्पर्धांचे उदघाटन

Share

हिरेबागेवाडी येथे सुरु असलेल्या प्रीमिअर लीग२०२२ क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्याचे रविवारी विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी उदघाटन केले. या स्पर्धेतील पुरस्कार लक्ष्मीताई फौंडेशनने पुरस्कृत केले आहेत

सी. सी. पाटील, अडिवेश इटगी, बी. आर. पाटील, सुरेश इटगी, सय्यद सनदी, सलीम सत्तीगेरी, निंगाप्पा तळवार, सलीम गोकाक, समीर देवलापूर, फुरखान मुल्ला, रवी गानगी यांच्यासह ग्रामस्थ, क्रिकेटप्रेमी  उपस्थित होते.

दरम्यान, कंग्राळी खुर्द येथे ग्रामीण काँग्रेस कमिटीतर्फे भव्य हाफ पीच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. जिल्हा युवा काँग्रेसचे उपाध्यक्ष मृणाल हेब्बाळकर आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी या स्पर्धेचे उदघाटन केले. या स्पर्धेतील पुरस्कारही लक्ष्मीताई फौंडेशनने पुरस्कृत केले आहेत.

 

 

 

Tags: