गेल्या पंधरा दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दिवसागणिक मोठी वाढ होत चालली आहे. आज पेट्रोलचा दर 47 पैसे तर डिझेलचा दर 39 पैशांनी वाढला आहे. यासंदर्भात कोणीही आवाज उठवत नसल्याबद्दल युवा नेते राहुल जारकीहोळी यांनी नाराजी व्यक्त केली.

बेळगाव मधील जाधव नगर येथील कार्यालयात सतीश जारकीहोळी फाउंडेशनच्या वतीने बेळगाव दक्षिण उत्तर मतदारसंघातील विविध देवस्थान कमिटी तसेच मशिदींना खुर्ची तसेच साऊंड सिस्टम चे वितरण करण्यात आले. बेळगाव दक्षिण मतदार संघातील आंबेडकर भवन, फिश मार्केट हजरत मिर्जा वाले अली मज्जिद, कलमेश्वर रोड येथील गणपती मंदिर, पिरनवाडी येथील वाल्मिकी समुदाय भवन, मजगाव येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, टिळकवाडी येथील श्रीकृष्ण मंदिर, अरेबिया मद्रास धामणे कमिटी आदी ठिकाणी खुर्ची आणि साऊंड सिस्टमचे वितरण करण्यात आले.

यानंतर बोलताना राहुल जारकीहोळी म्हणाले, बेंगलोर मध्ये पेट्रोल आणि डिझेल दरात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून तेलाच्या दरात आतापर्यंत 8.40 रुपयांची वाढ झाली आहे. परंतु यावर कोणीही चर्चा करताना दिसत नाही. पेट्रोल डिझेल यासह जीवनावश्यक वस्तूंच्या दरात देखील वाढ होत चालली आहे. निवडणुका जवळ आल्या की केवळ भाषणे दिली जातात. अशी भाषणे देणारे आणि आश्वासने देणारे लोक आपल्याला नको आहेत, तर विकास आणि सर्वसामान्यांचा विचार करणारे लोक आपल्याला गरजेचे आहेत, असे मत राहुल जारकीहोळी यांनी व्यक्त केले.
याचप्रमाणे जिल्हा पंचायतीचे माजी सदस्य सिद्धू सुनगार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले, आपल्या मतदारसंघातील अडचणी आमदार सतीश जारकीहोळी यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर आमच्या समस्यांवर नेहमीच तोडगा काढला जातो. त्यांचा मतदारसंघ वेगळा असूनही या मतदारसंघात त्यांची वेळोवेळी मदत होते असेही सिद्धू सुनगार म्हणाले. ()
यावेळी जिल्हा पंचायतीचे माजी सदस्य अरुण कटांबळे, बेळगाव जिल्हा काँग्रेस प्रधान सचिव प्रदीप, परशुराम, रघु लोकूर, अरुण कटांबळे, किरण पाटील फजल मकानदार, मलगौड पाटील, बेळगाव महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे नगरसेवक यासह यमकनमर्डी मतदार संघाचे ग्रामपंचायत अध्यक्ष तसेच सदस्य उपस्थित होते.


Recent Comments