Belagavi

कर्नाटक राज्य रयत संघ आणि हसिरू सेनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Share

कर्नाटक राज्य महामार्ग प्राधिकरणाने घाट घातलेल्या हलगा – मच्छे बायपास मार्गावर असलेल्या शेतवाडीत गैरप्रकारांना उत आला असून यावर आळा घालण्यासाठी कर्नाटक राज्य रयत संघ आणि हसिरू सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.राज्य महामार्ग प्राधिकरणाने घाट घातलेल्या हलगा – मच्छे बायपास मार्गावर असलेल्या शेतवाडीत दारूच्या बाटल्यांचा खच भरला आहे. आसपास असलेल्या शेतवाडीत सर्रास गैरप्रकार सुरू असल्याचे निदर्शनास आले असून रविवारी कर्नाटक राज्य रयत संघ आणि हसिरू सेनेच्या वतीने शेतकऱ्यांनी या शेतवाडीतील हा कचरा स्वच्छ केला आहे. या परिसरात सर्रास गांजा, दारू तसेच मटका जुगार सारखे गैरप्रकार मोठ्या प्रमाणात सुरू असून या प्रकारामुळे मोठी दहशत निर्माण झाली आहे. या प्रकारची नोंद घेऊन जिल्हा प्रशासनाने आळा घालण्यासाठी योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करत आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.

रविवारी कर्नाटक राज्य रयत संघ आणि हसिरू सेनेच्या कार्यकर्त्यांनी हा सारा परिसर स्वच्छ केला असून या माध्यमातून सुमारे 2 टेम्पो भरतील इतक्या दारूच्या बाटल्या मिळाल्या आहेत. याचप्रमाणे आसपास शेतवाडीत मोठ्या प्रमाणात माती टाकण्यात येण्याच्या प्रकारात देखील वाढ होत चालली असून सदर प्रकार वडगाव पोलीस स्थानकाच्या निदर्शनास आणून देण्यात आला आहे, या प्रकारावर आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे अशी माहिती कर्नाटक राज्य रयत संघाचे राजू मरवे यांनी दिली.(बाईट)

शहापूर, मजगाव, वडगाव, येळ्ळूर आदी भागातील शिवारात मोठ्या प्रमाणात हे गैरप्रकार सुरू असून याठिकाणी दारू अड्डा बनविण्यात आल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केला. या परिसरातून महिला वर्गाला जा – ये करणे हे मोठे जिकिरीचे काम बनले आहे. शिवाय आसपास परिसरात टाकण्यात येणारी माती हे बायपासचे कटकारस्थान असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.(बाईट)

यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना कर्नाटक राज्य रयत संघ आणि हसिरू सेनेच्यावतीने निवेदन देण्यात आले आहे. निवेदन देताना कर्नाटक राज्य रयत संघ आणि हसिरू सेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: