Belagavi

एम. के. हुबळी येथे भक्तिभावाने श्री कलमेश्वर यात्रा, रथोत्सव

Share

 गुढीपाडव्यानिमित्त कित्तूर तालुक्यातील एम. के. हुबळी येथे श्री कलमेश्वर देवाचा यात्रा महोत्सव रथोत्सव भक्तिभावाने जल्लोषात पार पडला.

होय, युगादी-गुढीपाडव्यानिमित्त एम. के. हुबळी येथे रविवारी श्री कलमेश्वर देवाचा यात्रा महोत्सव व रथोत्सव भक्तिभावाने जल्लोषात पार पडला. रथोत्सव मिरवणुकीसमोर युवा वर्ग बेभान होऊन जल्लोषात नृत्य करीत होता. भक्तांचा उत्साह यावेळी ओसंडून वहात असल्याचे दिसून आले.

गोणिकांती हिरेमठाचे श्री चंद्रय्या स्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली ३१ मार्चरोजी या यात्रा महोत्सवाला प्रारंभ झाला होता. तो ५ एप्रिल पर्यंत चालणार आहे. यानिमित्त रविवारी रथोत्सव मिरवणूक काढण्यात आली. नंदिकेश्वर देवस्थानापासून सुरु झालेला कलमेश्वराची रथोत्सव मिरवणूक पेठे खुटापर्यंत काढण्यात आली. यावेळी भक्त हर हर महादेव असा जयघोष करत होते.

मिरवणूक मार्गावर भक्तांनी रथासमोर पाणी ओतून नारळ वाढवून नैवैध्य अर्पण केला. शेकडो भाविक या रथोत्सव मिरवणुकीत सहभागी झाले होते.

 

Tags: