बेळगाव जिल्ह्यातील गोकाकसह राज्यभरात बुधवारी सकाळपासूनच भ्रष्टाचार प्रतिबंधक दलाने (एसीबी) छापासत्र सुरु केले आहे. एसीबीने तब्बल ७८ ठिकाणी एकाचवेळी छापे टाकून अवैध संपत्तीचा शोध सुरु केला आहे.

कर्नाटकातील तब्बल ७८ ठिकाणी एसीबीने बुधवारी सकाळी एकाचवेळी छापे टाकले. राजधानी बंगळूरमध्ये ३ ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. १८ सरकारी अधिकाऱ्यांची कार्यालये व अन्य ठिकाणे मिळून एकूण ७८ ठिकाणी हे छापे टाकण्यात आले आहेत. एसीबीचे २००हुन अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या जंबो कारवाईत भाग घेतला आहे. गोकाक तालुक्यातील कौजलगी विभागाचे कार्यकारी अभियंता शेखर रेड्डी पाटील यांच्या कार्यालयावरही छापा टाकून एसीबीने त्यांना चांगलाच शॉक दिला आहे. या ठिकाणी कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे.


Recent Comments