बेळगावमधील दहावीच्या विद्यार्थिनीने इंग्रजी पुस्तक लिहिले असून या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला.

साक्षी गंगूर असे या विद्यार्थिनीचे नाव असून फाईंड द ट्रॅजर इन युवर सेल्फ, एस युवर प्रिशियस असे साक्षीने लिहिलेल्या पुस्तकाचे नाव आहे. महिला विद्यालय इंग्लिश मिडीयम शाळेच्या या विद्यार्थिनीने लिहिलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन शाळेच्या सभागृहात आमदार अनिल बेनके, माजी आमदार संजय पाटील आणि आर्ष विदयाश्रमाचे चितपप्रकाशानंद स्वामीजी यांच्याहस्ते पार पडले. 

दहाव्या इयत्तेत शिकणाऱ्या साक्षीने वयाच्या १५ व्या वर्षी या पुस्तकाची निर्मिती केली आहे. या पुस्तकात दिनचर्या, आहार, आरोग्य, अध्यात्म, समाज आणि मानसिक वृत्तीशी निगडित भावना, उत्साह, प्रगती, जीवनातील सुसूत्रता याविषयी लिहिण्यात आले आहे. या पुस्तकामुळे आपल्या जीवनात आमूलाग्र बदल घडू शकतात. स्कारंत्मक दृष्टिकोन निरमा होऊ शकतो असे साक्षीने सांगितले.
या पुस्तकाचे प्रकाश एम वाय गंगूर फाउंडेशनच्यावतीने करण्यात आले असून शाळेच्या सभागृहात झालेल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments