Belagavi

कुमारस्वामी ले आऊटमध्ये महाशिवरात्र

Share

 बेळगावातील कुमारस्वामी ले आऊटमधील शिवालयात 10 व्या महाशिवरात्रीनिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

कुमारस्वामी ले आऊट रहिवाशी संघ, गणेशोत्सव मंडळ आणि वसाहतीतील महिला मंडळाच्या वतीने कुमारस्वामी ले आऊटमधील शिवालयात महाशिवरात्र विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. खा. मंगल अंगडी यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी लिंगायत नेते रुद्रण्णा चंदरगी यांचा सत्कार करण्यात आला. फ्लो

यावेळी बोलताना शिवालय सेवा समितीचे रुद्रण्णा चंदरगी म्हणाले, कुमारस्वामी ले आऊट ही माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या सहकार्यातून साकारलेली शहरातील एक सुंदर वसाहत आहे. आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी ५ कोटी रुपये खर्चातून येथे विविध विकास कामे केली आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळेच आज ही वसाहत विकास पावत आहे.

यावेळी खा. मंगल अंगडी यांनी कार्यक्रमस्थळी भेट देऊन शिवशंकराचे दर्शन घेतले. महाशिवरात्रीनिमित्त आयोजित महाप्रसादाला त्यांनी चालना दिली. यावेळी हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

 

 

 

Tags: