Gokak

गोकाकमध्ये हिजाबसाठी पुन्हा हायड्रामा !

Share

 गोकाकमधील सरकारी एक्स म्युनिसिपल पदवी कॉलेजसमोर सोमवारी पुन्हा हिजाबसाठी हायड्रामा झाला. 

होय, गोकाक शहरात सरकारी महाविद्यालयासमोर पुन्हा आज, सोमवारी हिजाबसाठी विद्यार्थिनी अडून बसल्याची घटना घडली. शिक्षणापेक्षा आम्हाला हिजाब महत्वाचा आहे आहे असे या विद्यार्थिनींचे म्हणणे होते. तर आम्हाला शिक्षणासोबतच हिजाबही हवा असा सूर काही विद्यार्थिनींमधून ऐकू आला.

काही झाले तरीही आम्हाला हिजाब पाहिजे म्हणजे पाहिजेच असा हट्ट करीत काही विद्यार्थिनींनी सोमवारी सकाळी म्युनिसिपल कॉलेजसमोर निदर्शने केली. हिंदू विध्यार्थी भगवी उपरणी-शेला घालून आले तर आम्हाला काही अडचण नाही, अनेक वर्षांपासून आम्ही हिज घालत आलो आहोत. कोर्टाचा आदेशही नाही. मग आताच का अडवणूक करताय? तुम्हाला पँट काढून या म्हटल्यावर कसे वाटेल? त्यामुळेच आमचे प्राण गेले तरी बेहेत्तर पण आमच्या मुलींना हिजाब पाहिजेच असे एका विद्यार्थिनीच्या आईने सांगितले.  यावेळी काही महिला पोलिसांनी कॉलेज परिसरात जमावबंदी आदेश लागू आहे, निदर्शने करू नका असा समजावले. तरीही विद्यार्थिनींनी आपला हेका सोडला नाही.

 

Tags: