Belagavi

मृतांच्या नावे कोट्यवधींचा भ्रष्टाचार बेळगावमध्ये पुन्हा एक नवा भ्रष्टाचार

Share

कर्नाटक वीज वितरण निगम पट्टीने सहकारी संघात संचालक मंडळाने तब्बल ३.२७ कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचे उघडकीस आले आहे.

बेळगावमधील कृषी उत्पन्न समितीला शड्डू ठोकून २०११ मध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नावे २०१४ मध्ये येणे लेआऊट करून बेकायदेशीर रित्या जय किसान भाजी मार्केटची उभारणी करण्यात आल्याचे प्रकरण अद्याप ताजे असून बेळगाव जिल्ह्यात पुन्हा एका नव्या भ्रष्टाराची माहिती उघडकीस आली आहे.

कर्नाटक वीज वितरण निगम पट्टीने सहकारी संघात संचालक मंडळाच्यावतीने तब्बल ३.२७ कोटी रुपयांचा दुरुपयोग करण्यात आल्याची माहिती उघडकीस आली आहे. मृत व्यक्तीच्या नावे एक दोन नाही तर ३० कर्जाची खाती उघडण्यात आली असून संघाचे माजी अध्यक्ष नाथाजी पाटील यांच्यासह १७ पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सध्याचे संघाचे सचिव सुरेश वड्डर यांनी सीईएन पोलीस स्थानकात लॆखी तक्रार दिली आहे. गेल्या महिन्यात बेकायदेशीरपणे मालमत्ता असल्याच्या आरोपाखाली नाथाजी पाटील यांच्यावर एसीबी पथकाने धाड टाकली होती. पुन्हा आता नाथाजी पाटील यांच्यासंदर्भात नवा आरोप पुढे आला आहे. १ जून २०१५ ते ऑक्टोबर २०१८-२०२० या कार्यकाळात गैरव्यवहार झाल्याचे सहकारी खात्याच्या ऑडिट दरम्यान जाहीरपणे सांगण्यात आले होते. यासंदर्भात शहर पोलीस आयुक्त डॉ. बोरलिंगय्या यांनी माहिती दिली आहे.

कर्नाटकात नियमितपणे मोठमोठे गैरव्यवहार निदर्शनास येत आहेत. सध्या नाथाजी पाटील यांच्यावरील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप पुढे आला असून या प्रकरणी १७ जणांना अटक करण्यात आली आहे. बेळगाव शहरात बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या घटनांचा पर्दापाश होत असून बेळगाव पोलीस अशा भ्रष्ट लोकांना मोठा शॉक देत आहेत.

Tags: