Vijayapura

मुद्देबिहाळ तालुक्यातील जवानांचा अपघाती मृत्यू

Share

मुद्देबिहाळ तालुक्यातील बसवराज डोंगरगावी या जवानाचा अपघाती मृत्यू झाला आहे.

मुद्देबिहाळ तालुक्यातील तंगडगी या गावचे जवान बसवराज डोंगरगावी यांचा अलमट्टी राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला असून या अपघातात त्यांचा मृत्यू झाला आहे. ८ वर्षांपूर्वी सैन्यदलात भरती झालेले बसवराज सध्या बिहार येथे सेवा बजावत होते. अपघातानंतर त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचाराअभावी सदर जवानाचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वीच रजेवर आलेल्या जवानाच्या अपघाती मृत्यूमुळे मुद्देबिहाळ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Tags: