Belagavi

बेळगाव नगर विकास प्राधिकरणाची कारवाई ;अनधिकृत इमारती हटविल्या

Share

बेळगाव नगरविकास प्राधिकरणाचे कार्य प्रगतीपथावर आहे. बुडा जमिनीवर निर्माण करण्यात आलेल्या अनधिकृत इमारती आज बुडतर्फे हटविण्यात आल्या आहेत.

बेळगावमधील बुडाच्या जमिनीवर निर्माण करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम बुडा आयुक्तांच्या आदेशाखाली हटविण्यात आले आहे. या कारवाईनंतर अनधिकृत लेआऊट निर्माण करू नयेत तसेच अनधिकृत प्लॉट खरेदी करू नयेत अशी सूचना देण्यात आली.

या वेळी अभियंता एस.सी. नायक, ए. इ. हिरेमठ, ए. इ. प्रसन्ना आणि माळमारुती पोलीस स्थानकाचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Tags: