उद्योजक नासिर बागवान यांच्या वाढदिवसा निमित्त कर्नाटक गडीनाडू हितरक्षण वेदिकेच्यावतीने गरीब रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले .

कित्तूर तालुक्यातील बेलूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील गरीब रुग्णांनाउद्योजक नासिर बागवान यांच्या वाढदिवसा निमित्त कर्नाटक गडीनाडू हितरक्षण वेदिकेच्यावतीने गरीब रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले . मलप्रभा साखर कारखान्याचे अध्यक्ष नासिर बागवान यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम हाती घेण्यात आला होता.

या वेळी वेदिकेचे महासचिव एम. एम. राजाभाई म्हणाले कि, सीमाभागात अशा पद्धतीने अनेक उपक्रम राबविण्यात येतात. स्वखर्चातून हे उपक्रम राबवत अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार आणि गरीब तसेच बेघर जनतेचीही मदत त्यांनी केली आहे. त्यांचे हे कार्य कौतुकास्पद असल्याचे मत राजाभाई यांनी व्यक्त केले.
यावेळी बसवराज भंगी , कल्लाप्पा अगसीमनी, डॉ सरस्वती म्यागी आदी उपस्थित होते .


Recent Comments