Gokak

आईसक्रीम विक्रेत्याच्याहस्ते फडकावला तिरंगा; कोण्णूर ग्रामस्थांचा आदर्श

Share

गोकाक तालुक्यातील कोण्णूर ग्रामस्थांनी आज एका कष्टकऱ्याच्या हस्ते तिरंगा फडकावून अनोख्या पद्धतीने प्रजासत्ताक दिन साजरा केला.

होय, देशभरात आज ७३ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात येतोय. या पार्श्वभूमीवर गोकाक तालुक्यातील कोण्णूर ग्रामस्थांनी मात्र एक वेगळाच आदर्श घालून दिला. गरीब-श्रीमंत असा भेद न करता चक्क एका आईसक्रीम विक्रेत्याच्याहस्ते ध्वजारोहण करून वेगळा पायंडा पाडला. गेली ५० वर्षे आईसक्रीम विकून कुटुंबाचा चरितार्थ चालविणाऱ्या बाबू शेख यांच्याहस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला.

आपल्याहस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आल्याने बाबू शेखही खूपच भावुक दिसले. ध्वजारोहणानंतर ते म्हणाले, गेल्या ५० वर्षांपासून आईसक्रीम विकतोय. पण आज गावात माझ्याहस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. आयुष्यात माझ्यासाठी हा भाग्याचा, सर्वोच्च आनंदाचा दिवस आहे.  यावेळी कोण्णूर नगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

 

Tags: