राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. पवार यांनी आज दुपारी दोनच्या सुमारास ट्वीट करत याविषयीची माहिती दिली आहे. त्याचबरोबर आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांना खबरदारी घेण्याचं आणि चाचणी करून घेण्याचं आवाहनही केलं आहे.
![](https://marathi.innewsbelgaum.com/wp-content/uploads/2024/04/SHIV-OM-copy.jpg)
आपल्या ट्वीटमध्ये शरद पवार म्हणतात, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. पण काळजीचं काही कारण नाही. मी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे. मी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती करतो की त्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी आणि खबरदारी घ्यावी.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. काळजी घेण्यास सांगून लवकर बरे व्हा अशा शुभेच्छा मोदींनी त्यांना दिल्या. त्याबद्दल पवार यांनी मोदींचे आभार मानले आहेत.
शरद पवार ८१ वर्षांचे असून त्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत.
गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातले अनेक मंत्री आणि विविध पक्षांतले अनेक प्रमुख नेते कोरोनाबाधित आढळले होते. यात पंकजा मुंडे, सुप्रिया सुळे, रोहित पवार, राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, दिलीप वळसे पाटील अशा अनेकांचा समावेश आहे. यातले काहीजण कोरोनामुक्त झाले आहेत.
Recent Comments