COVID-19

धारवाड जिल्ह्यात पुन्हा भरल्या शाळा

Share

सरकारच्या आदेशाप्रमाणे धारवाड जिल्ह्यात कोविड मार्गसूचीचे पालन करत आजपासून शाळा पुन्हा सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची हजेरी कमीच राहिली.

होय, धारवाड जिल्ह्यात कोरोनाचा वाढत संसर्ग पाहून जिल्हाधिकारी डॉ. नितेश पाटील यांनी १२ जानेवारीला जिल्ह्यातील शाळा बंद ठेवण्याचा आदेश बजावला होता. मात्र आता सरकारने नवीन कोविड मार्गसूची जारी करून शाळा पुन्हा सुरु करण्याचा आदेश बजावला आहे. त्यामुळे आजपासून धारवाड जिल्ह्यातील शाळांच्या घंटा पुन्हा वाजल्या. २ आठवड्यांच्या सुटीनंतर आज शाळा पुन्हा गजबजला. परंतु पहिल्या दिवशी हजेरीचे प्रमाण कमी होते. त्यामुळे एका बाकावर एक विध्यार्थी बसवून वर्ग भरवण्यात आले.या संदर्भात शिक्षिका ज्योती पाटील यांनी सांगितले की, सरकारच्या आदेशावरून राज्यातील काही जिल्हे वगळता सर्वत्र शाळा आजपासून सुरु करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असून जे विध्यार्थी बाधित आढळे त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात येत आहेत. सध्या विद्यार्थ्यांची हजेरी कमी असली तरी एक-दोन दिवसांत विध्यार्थी पूर्ण संख्येने नियमित शाळेला येतील अशी अपेक्षा आहे. बाईट एकंदर लवकरच नेहमीप्रमाणे शाळा पूर्ण संख्येने सुरु होतील असा आशावाद शिक्षकांना आहे.

 

Tags: