Gokak

मेकेदाटू पदयात्रा रोखण्यासाठीच विकेंड कर्फ्यू : आ. सतीश जारकीहोळी

Share

काँग्रेसची मेकेदाटू पदयात्रा रोखण्यासाठीच सरकारने विकेंड कर्फ्यू लावला होता. आता पदयात्रा स्थगित झाल्यामुळेच विकेंड कर्फ्यू रद्द केला असा आरोप केपीसीसी कार्याध्यक्ष . सतीश जारकीहोळी यांनी केला.

गोकाक येथील आपल्या निवासस्थानी रविवारी पत्रकारांशी बोलताना आ. सतीश जारकीहोळी म्हणाले, काँग्रेसची पदयात्रा बेंगळुरपर्यंत पोहोचूच नये असा राज्यातील भाजप सरकारचा हेतू होता. त्यामुळेच त्यांनी विकेंड कर्फ्यू जारी केला. आता आम्ही पदयात्रा तात्पुरती स्थगित केल्यावर सरकारने विकेंड कर्फ्यू मागे घेतला आहे. पण लोकांच्या आता हे लक्षात आले आहे. त्यामुळे जेथे पदयात्रा स्थगित केली तेथूनच ती पुन्हा सुरु करण्यात येईल. भाजपला आमच्या पदयात्रेची भीती वाटत आहे. हे सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. त्यामुळेच आपले अपयश झाकण्यासाठी असे वागत आहे असा आरोप जारकीहोळी यांनी केला.

एकंदर, राज्यात कोरोनाचा फैलाव वेगाने होत असल्याने सरकारने विकेंड कर्फ्यू जारी केला होता. त्यामुळे काँग्रेसने मेकेदाटू पदयात्रा स्थगित केली होती. आता विकेंड कर्फ्यू उठल्यावर काँग्रेस पदयात्रेबाबत काय भूमिका घेणार हे पहावे लागेल.

 

 

Tags: