COVID-19

कोणापुढे झुकून विकेंड कर्फ्यू रद्द केला नाही : मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

Share

जीवही वाचला पाहिजे आणि जीवनही सुरु राहिले पाहिजे हीच आमची धारणा आहे. जनतेला समस्या होऊ नयेत यासाठी विकेंड कर्फ्यू रद्द केला आहे, कोणापुढे झुकून नव्हे असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज दिले.

बेंगळुरातील आरटी नगरातील आपल्या निवासस्थानी शनिवारी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, विकेंड रद्दचा निर्णय कोणाच्या दबावापुढे झुकून घेतलेला नाही. कोरोना केस जास्त असल्या तरी इस्पितळात दाखल होणाऱ्यांची संख्या कमी आहे. बरे होणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे कोरोना साथीवर नियंत्रण ठेवता येईल असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे हा निर्णय घेतला आहे. बाईट ‘कृष्णा’सह आंतरराज्य जलविवाद सोडवण्यासंदर्भात राज्याची भूमिका मंडळाच्या तज्ज्ञांशी सभा घेऊन चर्चा करण्यात येणार आहे. त्यात कायदेतज्ज्ञही व्हर्च्युअली भाग घेणार आहेत. पाणीतंटे परिणामकारकरीत्या सोडविण्यासाठी सभेत गांभीर्याने चर्चा करण्यात येणार आहे असे बोम्मई यांनी सांगितले. बाईट  राज्यात सध्या दूध, पाणी, विजेचे दर वाढवण्याचा कसलाच प्रस्ताव सरकारपुढे नाही, तसा कोणताही निर्णयही झालेला नाही. सर्वदृष्टीने विचार करूनच याबाबत निर्णय घेण्यात येईल. सरकार चालवताना दरवाढीसारखे विषय येणे सामान्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

 

 

Tags: