COVID-19

स्वतः डोस घेऊन तहसीलदारांनी केले मोहिमेचे उदघाटन

Share

 खानापुरात शनिवारी बूस्टर डोस लसीकरण मोहिमेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी तहसीलदार प्रवीण जैन यांनी स्वतः बूस्टर डोस घेऊन लसीकरण मोहिमेचे आगळ्या पद्धतीने उदघाटन केले.

होय, कर्नाटकात बूस्टर डोस देण्याच्या मोहिमेला प्रारंभ करण्यात आला आहे. खानापूर तहसील कार्यालयातही खानापूर तालुक्यातील बूस्टर डोस लसीकरण मोहिमेला आज चालना देण्यात आली. तहसीलदार प्रवीण जैन यांनी स्वतः डोस घेऊन लसीकरणाला चालना दिली. फ्लो

यावेळी तहसील कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.

 

 

Tags: