COVID-19

लक्षणे नसल्यास कोविड चाचणी सक्तीची नाही :आरोग्यमंत्री

Share

आयसीएमआरच्या आदेशानुसार केवळ कोविडची लक्षणे दिसून आल्यास संबंधित व्यक्तीची कोविड टेस्ट करण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिली.

बंगळूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना आरोग्यमंत्री डॉ के सुधाकर म्हणाले, डॉक्टरांनी कोविडची लक्षणे नसणाऱ्या व्यक्तींना कोविड चाचणी सक्तीची करू नये, यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. आयसीएमआरच्या आदेशानुसार केवळ कोविडची लक्षणे दिसून आल्यास संबंधित व्यक्तीची कोविड टेस्ट करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, सध्या कोविडच्या तिसऱ्या लाटेचे संकट आहे. यादरम्यान कोणत्याही राजकीय गोष्टींवर चर्चा करणे योग्य नसल्याचे मत डॉ. के सुधाकर यांनी व्यक्त केले.

नुकत्याच झालेल्या बैठकीत विकेंड कर्फ्यू हटविण्यात आला आहे. कोविड नियंत्रणासाठी सरकारतर्फे अनेक नियम जाहीर करण्यात येत आहेत. आता पुढील काळात कोविड नियंत्रणासाठी सरकार कोणते पाऊल उचलेल हे पाहावे लागेल.

Tags: