COVID-19

विरोधी पक्षाचे काम योग्य रीतीने पार पडत आहे

Share

काँग्रेस नेत्यांनी भाजपच्या बॅनरबाजीवरून केलेल्या आरोपांना आरोग्यमंत्री डॉ. के सुधाकर यांनी प्रत्त्युत्तर दिले असून काँग्रेस पक्ष विरोधी पक्षाचे काम योग्यरितीने पार पाडत असल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय.

विकेंड कर्फ्यूबाबत विरोधी पक्ष नेते सिद्धरामय्या यांनी केलेल्या विधानाबाबत बंगळूरमध्ये प्रतिक्रिया देताना आरोग्य मंत्री डॉ.. के. सुधाकर म्हणाले, केवळ विरोधाला विरोध करणारा हा पक्ष असून काँग्रेसकडून विचारपूर्वक सल्ला मिळण्यापेक्षा केवळ विरोध करण्यात येत असल्याबद्दल त्यांनी असमाधान व्यक्त केले.

रुग्णालयाच्या कोनशिला स्थापना दरम्यान भाजप नेत्यांचे बॅनर झळकले होते. हा सरकारी कार्यक्रम आहे कि भाजपचा कार्यक्रम असा सवाल काँग्रेस नेत्यांनी उपस्थित केला होता. यावर बोलताना सुधाकर म्हणाले, ज्या पक्षाची सत्ता असेल त्या सत्तेतील नेत्यांचे बॅनर सामान्यतः स्थानिक नागरिक लावतात. आम्ही सरकारकडून पैसे दिले नव्हते. आणि बॅनर लावण्याची ही पहिलीच वेळ नाही. काँग्रेस सरकार काळात भाजपचे बॅनर लावण्यात आले होते का? असा सवालदेखील आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी उपस्थित केला.

एकंदरीत आज डॉ. के. सुधाकर यांनी काँग्रेस नेत्यांनी केलेल्या आरोपांना प्रत्त्युत्तर दिले असून काँग्रेस पक्ष विरोधी पक्षाचे काम योग्यरितीने पार पाडत असल्याचे म्हटले आहे.

Tags: