COVID-19

निर्बंधांबाबत उद्या तज्ज्ञांशी चर्चा करून मुख्यमंत्री घेतील निर्णय : सुधाकर 

Share

उद्याच्या सभेत तज्ज्ञांशी चर्चा करून मुख्यमंत्री निर्बंधांबाबत निर्णय घेतील. लोकांना कसलाही त्रास होऊ नये हीच सरकारची इच्छा आहे असे आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी सांगितले.

राज्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई उद्या हाय व्होल्टेज सभा घेणार आहेत. त्या संदर्भात आज बेंगळुरात पत्रकांशी बोलताना आरोग्यमंत्री डॉ. सुधाकर म्हणाले, लोकांच्या हिताचे निर्णय घ्यावेत, लोकांना त्रास होणार नाहीत असे कोरोना निर्बंध जारी करावेत हा सरकारचा उद्देश आहे.

काही अपरिहार्य निर्णय अनिवार्य परिस्थितीत घ्यावे लागतात. दिवसाला ६० हजार वरून १ ते १.२० लाख रुग्णांची नोंद होईल असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. बेंगळुरात रुग्णसंख्या जास्त असल्याने होम आयसोलेशनमधील रुग्णांना मेडिकल किट्स देण्यास प्रारंभ केला आहे. २-३ दिवसांत सर्व जिल्हा केंद्रांवरही ते उपलब्ध केले जातील असे मंत्री सुधाकर यांनी सांगितले.

बेंगळुरात रुग्णसंख्या जास्त असल्याने उद्याच्या सभेत त्यावर चर्चा केली जाईल. सर्व आकडेवारी तपासून कोणत्या निर्बंधांमुळे काय लाभ होईल? कोणते निर्बंध लावावेत यावर निर्णय घेण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले.

एकंदर, दिवसेंदिवस कर्नाटकाभोवती कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला आहे. तर दुसरीकडे नाईट कर्फ्यू, विकेंड कर्फ्यूला विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर बोम्मई सरकार उद्याच्या सभेत काय निर्णय घेणार याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

 

 

 

Tags: