COVID-19

हुक्केरीवासियांची खरेदीसाठी मोठी गर्दी

Share

 गेले दिवस विकेंड कर्फ्यूला चांगला प्रतिसाद दिलेल्या हुक्केरीवासियांनी आज सोमवारी मात्र खरेदीसाठी मोठी गर्दी केली.

होय, हुक्केरी शहर आणि तालुक्यात गेले २ दिवस विकेंड कर्फ्यूला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. मात्र आज सकाळी लोकांनी बाजारात खरेदीसाठी गर्दी केली.

खास करून भाजीपाला खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले. खरेदीच्या नादात मास्क, सामाजिक अंतराचा मात्र त्यांना विसर पडला होता. दुपारी १२ पर्यंत खरेदीसाठी नागरिकांची बाजारात वर्दळ सुरूच होती. कोरोनाचे नियम पायदळी तुडवले जात असताना अधिकाऱ्यांनी मात्र त्याकडे कानाडोळा केल्याचे दिसून आले.

 

 

 

Tags: