COVID-19

देशात लसीकरणाची वर्षपूर्ती; १५७ कोटी लोकांनी घेतली लस

Share

देशात एक वर्षापूर्वी लसीकरणाची सुरुवात झाली होती. त्याला आज एक वर्षांचा कालावधी झाला आहे. कोरोना या भयावह विषाणूपासून बचाव करण्यासाठी भारतात आपातकालीन कोरोना लसीच्या वापरास मंजुरी देण्यात आली होती. १६ जानेवारी २०२१ पासून शनिवारपर्यंत देशात १५७ कोटी जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. त्यात ९४ कोटी प्रौढ आणि ७.४० कोटी १५ ते १८ या वयोगटातील मुलांनी कोरोनाची लस टोचून घेतली आहे. यासह, सध्या लसीकरणयोग्य लोकसंख्या १०१.४० कोटी आहे.

केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत सुमारे ६४.३१ टक्के नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहे. तर ८९.१६ म्हणजे ९०.४१ कोटी नागरिकांनी लसीचा फक्त पहिला डोस घेतला आहे. तर आतापर्यंत १०.९९ कोटी नागरिकांनी कोरोना लसीचा एकही डोस घेतलेला नाही. तर अजूनही २५.१९ कोटी नागरिकांना लसीचा दुसरा डोस दिला जाणार आहे.
मुलांच्या लसीकरणात पंजाब मागे
यावर्षी ३ जानेवारीपासून १५ ते १८ या वयोगटातील मुलांना कोरोना लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आतापर्यंत ३ कोटी २५ लाख २८ हजार ४१६ मुलांना लसीचा पहिला डोस घेतला आहे.

त्यात आंध्र प्रदेशमध्ये ८७% तर हिमाचल प्रदेशमध्ये ८०% मुलांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. १५ ते १८ या वयोगटातील लसीकरणात पंजाब सर्वात मागे असल्याची बाब समोर आली आहे. पंजाबमध्ये केवळ पाच टक्के मुलांनीच कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. १० जानेवारीपासून कोरोना वॉरियर्स आणि ६० वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील गंभीर आजार असलेल्यांना ३८ लाख प्रीकॉशन डोस देण्यात आले आहेत.

हिमाचल प्रदेशात १०० टक्के लसीकरण हिमाचल प्रदेशात सर्व प्रौढांना दोन्ही डोस देण्यात आले आहे. चंदीगड आणि मध्य प्रदेशही लवकरच हे लक्ष्य गाठतील. पण, हे लक्ष्य गाठण्यात पंजाब आणि राजस्थान अजूनही खूप मागे आहेत.
प्रत्येक महिन्यात ३० कोटी लसीकरण देशात दोन कंपन्याची कोरोना लस दिली जात आहे. सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेकची को-वॅक्सीन या दोन लसीला देशात वापरास आपातकालीन मंजुरी देण्यात आली होती, त्याअंतर्गत देशात लसीकरण सुरू आहे. सीरम इंस्टीट्यूट दर महिन्याला सुमारे २५ कोटी डोस तयार करतो, तर भारत बायोटेक ही कंपनी केवळ ५ कोटी डोसची महिन्याभरात निर्मिती करते. सीरम आणि भारत बायोटेक यांच्याकडे सध्या १० कोटींचे डोस उपलब्ध आहेत. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे सुमारे १४.८४ कोटी कोरोना लसी ठेवण्यात आल्या आहेत.

दोन्ही लसीनंतरच तयार होते अँटीबॉडीज
नॅशनल टेक्निकल ऍडव्हायजरी ऑफ इम्यूनाइझेशनचे चेअरमन डॉ. नरेंद्र अरोरा यांनी सांगितले की, लसीचा पहिला डोस शरिरात अँटीबॉडीज तयार करण्यास सुरुवात करते, तर दुसरी लस घेतल्यानंतर तात्काळ अँटीबॉडीज तयार होते. त्यामुळे दोन्ही लस वेळेवर घेणे बंधनकारक असल्याचे अरोरा यांनी सांगितले.

Tags: