COVID-19

गानसम्राज्ञी लता मंगेशकरांची प्रकृती स्थिर

Share

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालन्यात माध्यमांशी बोलताना दिली. तसेच ब्रीच कँडीच्या मॅनेजमेंटला त्यांनी विनंती केली की, लता मंगेशकर यांच्या प्रकृतीसंदर्भातील सर्व अपडेट माध्यमांना द्यावेत. तसेच मॅनेजमेंट आणि मंगेशकर परिवार एकत्रित चर्चा करून आरोग्य विषयक माहिती माध्यमांना देतील, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात लता मंगेशकर यांना दाखल करण्यात आलं आहे.

लता मंगेशकर यांच्यावर उपचार करणारे डॉ. प्रतीत समदानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, लता मंगेशकर यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. त्या अजूनही आयसीयूमध्ये आहेत. तसेच लता मंगेशकर यांना त्यांच्या आरोग्याविषयीची जास्त माहिती लोकांपर्यंत पोहोचावी, असं वाटत नाही.

कोरोनाची लागण झाल्यामुळे लता मंगेशकर यांना न्युमोनिया झाला आहे. याला कोविड न्युमोनिया असं म्हटलं जातं. लता मंगेशकर यांना रविवारी रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मुंबईच्या महापौर यांनी दिलेल्या माहितीनुसार, लता मंगेशकर यांना कोविड न्युमोनिया झाला आहे. रविवारी पहाटे त्यांना ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सध्या त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. तसेच, मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉ. प्रतित समदानी आणि त्यांची टीम लता दीदींवर उपचार करत आहेत.

दरम्यान, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना गानकोकीळा म्हणून ओळखलं जातं. त्या भारताच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक-गायिकांपैकी एक आहेत. आज त्या तब्बल 92 वर्षांच्या आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत हजारो गाणी गायिली आहेत. त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. हिंदी संगीतविश्वात त्यांना ‘लता दीदी’ म्हणून ओळखलं जातं. लता मंगेशकर यांनी 980 पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, 20 हून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केलं आहे.

Tags: