बेळगाव जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरूच असून आता निपाणीतील १८ विध्यार्थ्यांना त्याची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
होय, बेळगाव जिल्ह्यातील निपाणी येथील प्रतिष्ठित केएलई संस्थेच्या स्वायत्त कॉलेजमधील १८ विध्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे त्यांच्या चाचणीत स्पष्ट झाले आहे. याची माहिती मिळताच तहसीलदार मोहन भस्मे यांनी कॉलेजला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी हे कॉलेज बंद ठेवण्याचा आदेश बजावला आहे.
निपाणी शहर आणि तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनेक विध्यार्थी या कॉलेजमध्ये शिक्षण घेतात. आता या कॉलेजच्या १८ विध्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने विध्यार्थी, पालक आणि शिक्षकांतही खळबळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Recent Comments