COVID-19

24 तासात 1.93 लाख नवीन केस; तिसऱ्या लाटेत ॲक्टिव्ह केस पहिल्यांदा 9 लाखांच्या पार

Share

देशभरात गेल्या 24 तासात 1 लाख 93 हजार नवीन कोरोना संक्रमित आढळले आहेत. 60,182 लोक बरे झाले आणि 442 बाधितांचा मृत्यू झाला. उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्येत 1 लाख 33 हजार 318 ची वाढ नोंदवण्यात आली आहे. सध्या 9.48 लाख कोरोना संक्रमितांवर उपचार सुरु आहेत.

देशात सक्रिय रुग्णांमध्येही 1.32 लाखांची वाढ नोंदवण्यात आली आहे. तिसऱ्या लाटेत सक्रिय रुग्णांची संख्येने  प्रथमच 9 लाखांचा आकडा पार गेल्या आहे. तर नवीन संक्रमितांमध्ये 25 हजारांची वाढ झाली आहे. यापूर्वी सोमवारी 1.69 लाख लोक संक्रमित आढळले होते.

देशात आता एकूण 3.60 कोटी लोक संक्रमणाच्या विळख्यात सापडले आहेत. ज्यापैकी 3.46 कोटी लोक बरे  झाले आहेत. आतापर्यंत 4 लाख 84 हजार 655 लोकांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात रुग्णांची संख्या वाढली

महाराष्ट्रात मंगळवारी पुन्हा रुग्ण वाढले. सोमवारी राज्यात 33,470 केस आढळले होते. मात्र मंगळवारी हे पुन्हा वाढून 34,424 झाले. गेल्या 24 तासांदरम्यान 22 जणांच्या मृत्यूचीही नोंद झाली आहे. या दरम्यान राज्यात 18,967 लोक बरेही झाले आहेत. राज्यात एकूण ऍक्टिव्ह केस वाढून 2.21 लाख झाल्या आहेत. आतापर्यंत राज्यात 69.87 लाख लोक कोरोना बाधित झाले आहेत. यापैकी 66.21 लाख बरे झाले आहेत. तर 1.42 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे महाराष्ट्रात पॉझिटिव्हिटी रेट 19% वरून  कमी होऊन 16% झाला आहे.

दरम्यान, मुंबईतून एक चांगली बातमी समोर आली आहे, येथे सलग चौथ्या दिवशी नवीन रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मंगळवारी, महानगरात 11,467 नवीन प्रकरणे आणि 2 मृत्यूची नोंद झाली आहे, जी सोमवारी आढळलेल्या 13,648 प्रकरणांपेक्षा कमी आहे. रविवारी महानगरात 19,474 रुग्ण आढळले होते. शनिवारी 20,318 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली होती. आता मुंबईतील एकूण सक्रिय प्रकरणांची संख्या 1 लाख ते 1 लाख 523 वर पोहोचली आहे.

Tags: