ओमायक्रॉन, डेल्टा असो, आरटीपीसीआर अहवाल पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह.. मनात कोणताही संशय न ठेवता प्रत्येकाने वैद्यकीय सल्ला घेऊन होम आयसोलेशनचा पर्याय निवडावा, आपल्याला आढळून येणाऱ्या आजारावरील लक्षणावर तात्काळ वैद्यकीय सल्ल्यानुसार उपचार घ्यावेत, असा सल्ला तज्ञ वैद्य डॉ. पवनकुमार यांनी दिलाय.
राज्यात कोरोना आणि ओमायक्रॉन रुग्णांची संख्या अधिक होत चालली असून यापार्श्वभूमीवर डॉ. पवनकुमार यांनी उपयुक्त अशी माहिती दिली आहे. सध्या वायरल आजाराच्या लक्षणांमध्ये वायरल फ्ल्यूचे प्रमाण अधिक आहे. डेल्टा, ओमायक्रॉन यामध्ये आणि सामान्य आजारांमध्ये फरक आहे. ओमायक्रॉन संसर्गामध्ये घसादुखी, घसा खवखवणे, नाकदुखी, नाकातून रक्त येणे, हातदुखी, पायदुखी, ताप, थकवा यासारखी लक्षणे आहेत. इंग्लंडमध्ये सुमारे ७०० जणांवरील ओमायक्रॉन लक्षणासंदर्भात अभ्यास करण्यात आला असून या अहवालामध्ये अनेक जणांमध्ये घशासंदर्भात अधिक लक्षणे आढळून आली आहेत. डेल्टा विषाणूसंदर्भातदेखील अशाचप्रकारची लक्षणे आढळून आली असून या लक्षणांसह जुलाब, पोटदुखीसारखी लक्षणेही आढळून आली आहेत. यासंदर्भात कोणीही घाबरून न जाता वैद्यकीय सल्ला घेऊन तात्काळ औषधोपचार घ्यावेत, औषधाने हे आजार बरे होत असून अशी लक्षणे आढळून आल्यास होम आयसोलेशनचा पर्याय निवडणे हे उत्तम असल्याचा सल्लाही डॉक्टर पवनकुमार यांनी दिलाय.
ओमायक्रॉन, डेल्टा असो, आरटीपीसीआर अहवाल पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह असो मनात कोणताही संशय न ठेवता प्रत्येकाने वैद्यकीय सल्ला घेऊन होम आयसोलेशनचा पर्याय निवडावा, ऑक्सिजनची कमतरता भासल्यास आपल्याला आढळून येणाऱ्या आजारावरील लक्षणावर तात्काळ वैद्यकीय सल्ल्यानुसार उपचार घ्यावेत, असा सल्ला तज्ञ वैद्य डॉ. पवनकुमार यांनी दिलाय.
दुसऱ्या लाटेनंतर प्रत्येकजण स्वतः डॉक्टर असल्याप्रमाणे वागत आहे. विनाकारण अँटिबायोटिक्स औषधांचे सेवन केले जात असून हे अत्यंत चुकीचे आहे. कोणत्याही प्रिस्क्रिप्शनशिवाय आणि वैद्यकीय सल्ल्याशिवाय औषधे न घेता ताप, हात-पाय दुखी, जाणवल्यास केवळ सिट्रिझिनची मात्रा घेण्यात यावी. याव्यतिरिक्त वैद्यकीय सल्ल्याशिवाय कोणतेही अँटिबायोटिक औषध घेऊ नये, असे आवाहन डॉ. पवनकुमार यांनी केले आहे.
कोरोनाच्या ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग अधिकाधिक फैलावत चालला असून या पार्श्वभूमीवर जनतेसाठी तज्ञ डॉक्टर पवनकुमार यांनी उपयुक्त अशी माहिती दिली असून कोणत्याही आजाराची लक्षणे आढळून आल्यास न घाबरता तात्काळ वैद्यकीय सल्ल्या घेऊन औषोधोपचार घ्यावेत असे आवाहन त्यांनी केले आहे.
Recent Comments