COVID-19

दिग्गज गायिका लता मंगेशकर यांना कोरोना

Share

जगप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. प्रकृती नाजूक बनल्याने त्यांच्यावर  सध्या ब्रीच कॅंडी इस्पितळात आयसीयूत उपचार करण्यात येत आहेत.

देशात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. अलीकडे अनेक बॉलीवूड सेलिब्रिटीही कोरोनाच्या कचाट्यात सापडत आहेत. या सेलिब्रिटींच्या यादीत दिग्गज गायिका लता मंगेशकर यांचाही समावेश झाला आहे. त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. त्या सध्या आयसीयूमध्ये असल्याचे वृत्त आहे.

कोविडमुळे लता मंगेशकर यांना न्यूमोनिया झाल्याची माहिती समोर आली आहे. याला कोविड न्यूमोनिया असेही म्हटले जाते. लता मंगेशकर शनिवारी रात्रीपासून ब्रिच कँडी रुग्णालयात आहेत. कोरोनामुळे त्यांची तब्येत नाजूक असल्याचे वृत्त आहे.

Tags: