COVID-19

विजापुरात कोरोनाने घेरले कोवळ्या मुलांना !

Share

राज्यात एकीकडे कोरोना संसर्ग वाढत असला तरी तो आजवर मोठ्या व्यक्तींमध्येच दिसून आला आहे. आता मात्र चिंताजनक बाब विजापूर जिल्ह्यात समोर आली आहे. १५ वर्षांहून कमी वयाच्या मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने खळबळ माजली आहे

होय, विजापूर जिल्ह्यात १५ वर्षांखालील मुले कोरोना पॉझीटिव्ह आढळून आल्याने पालकांमध्ये दहशत पसरली आहे. १ ते ९ जानेवारी या काळात जिल्ह्यात तब्बल ३२ मुलांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विजापूर जिल्ह्यात २ ते ५ वयोगटातील २, ६ ते १० वयोगटातील ५, ११ ते १५ वयोगटातील २५ मुले मिळून एकूण ३२ मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. विजापूर जिल्हा प्रशासनाने ही माहिती दिली आहे. दरम्यान, सामान्य कोरोना रुग्णांची संख्याही जिल्ह्यात वाढतच आहे. १ जानेवारीपासून आजअखेर १२२ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. जिल्हा आरोग्य खात्याने एकूण १२, ७७२ जणांची स्वाब टेस्ट केली आहे. फ्लो

 

Tags: