कोविडची लागण झाल्याचे निदान तपासणीत आल्यानंतर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आज, मंगळवारी उपचारांसाठी मणिपाल इस्पितळात दाखल झाले.
कालच मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांनी घरीच उपचार घेतले. मात्र आज सकाळी अधिक उपचारांसाठी ते मणिपाल इस्पितळात दाखल झाले. बोम्मई यांचे पुत्र भरत यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आपल्यात कोरोनाची लक्षणे आढळल्याचे भरत बोम्मई यांनी ट्विट करून कळविले आहे.
Recent Comments