COVID-19

देशात कोरोनाचे थैमान सुरूच : 24 तासात 1.68 लाख नवीन रुग्ण

Share

देशात कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेत 11 दिवसांच्या आत देशात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाखांनी वाढून 8 लाखांच्या पार गेली आहे. सोमवारी सलग 5 व्या दिवशी 1 लाखांपेक्षा जास्त प्रकरणे समोर आली.

देशात गेल्या 24 तासांच्या दरम्यान 1 लाख 67 हजार 550 नवीन रुग्ण आढळले आहेत. यापूर्वी रविवारी 1.79 लाख प्रकरणे आढळली होती. आता देशात एकूण 8 लाख 15 हजार 46 सक्रिय प्रकरणे आहेत.

सोमवारी एकूण 69,798 लोक बरे झाले, तर 277 लोकांचा मृत्यू झाला. दिलासादायक बाब म्हणजे, महाराष्ट्र, दिल्ली आणि पश्चिम बंगाल येथे सोमवारी नवीन प्रकरणांची संख्या देखील कमी झाली आहे, परंतु उत्तर प्रदेश या निवडणूक होत असलेल्या राज्यात नवीन प्रकरणांमध्ये वाढ होत आहे.

दिल्लीतील कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पत्रकार परिषद घेणार आहेत. यामध्ये राजधानीतील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. दुपारी 12 वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेत दिल्लीत निर्बंधांविषयी मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो.

महाराष्ट्रातील कोरोना स्थिती

महाराष्ट्रात गेल्या गेल्या 24 तासांत नवीन रुग्णांमध्ये सुमारे 11 हजारांची घट झाली आहे. राज्यात सोमवारी 33,470 नवीन रुग्ण आढळले, तर रविवारी 44,388 रुग्ण आढळले. सर्वात चांगली बातमी म्हणजे महाराष्ट्रात महामारीतून बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट होत आहे. रविवारी 15,351 च्या तुलनेत सोमवारी 29,671 जणांना डिस्चार्ज मिळाला. यादरम्यान 8 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या आता 2,06,046 झाली आहे. राज्यात आतापर्यंत 69.53 लाख लोक संसर्गाच्या विळख्यात सापडले आहेत.

Tags: