COVID-19

विकेंड कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर कागवाड स्तब्ध

Share

कोविड च्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने खबरदारीसाठी विकेंड कर्फ्यू जारी केला असून या पार्श्वभूमीवर आज कागवाड तालुक्यात या विकेंड कर्फ्यूला नागरिकांनी संपूर्ण पाठिंबा दिलेला दिसून आला.

शुक्रवारी रात्री ९ वाजता विकेंड कर्फ्यूला सुरुवात झाली असून नागरिकांना विनाकारण संचार करण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. सीमेवरून येणाऱ्या महाराष्ट्रातील नागरिकांमुळे कोविड रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून या पार्श्वभूमीवर कागवाड मध्ये कडक विकेंड कर्फ्यू पाळण्यात आलाय. शनिवारी सकाळी १० पर्यंत देखील नागरिक घराबाहेर पडलेले दिसून आले नाहीत.

यावेळी कागवाड तालुक्यातील ऐनापुरे नगर पंचायतीचे सदस्य अरुण गाणीगेर बोलताना म्हणाले, सरकारी आदेशानुसार परिसरातील जनतेने विकेंड कर्फ्यूला पाठिंबा दिला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार संपूर्णपणे बंद होते. यामुळे जनताही रस्त्यावर आढळून आली नाही. गेल्या दोन वर्षात झालेल्या लॉकडाऊनमुळे जनता आर्थिक संकटात आली असून पुन्हा लॉकडाऊन होईल याची धास्ती जनतेने घेतली आहे.

कोविडच्या वाढत्या रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने विकेंड कर्फ्यूचा निर्णय घेतला आहे. मागील दोन वर्षात कोविडमुळे अनेक संकटे सामोरे आली असून नागरिकांनी सरकारी मार्गसूचीचे पालन करणे आवश्यक आहे, असे आवाहन सरकार करत आहे.

Tags: