COVID-19

अरविंद केजरीवाल यांना कोरोना

Share

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोरोना झाला आहे. केजरीवाल यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे. संसर्ग झाल्याची माहिती मिळताच त्यांनी स्वतःला क्वारंटाइन केले आहे. अरविंद केजरीवाल पंजाब आणि उत्तराखंडमध्ये आम आदमी पक्षाचा प्रचार करत आहेत. सोमवारी केजरीवाल यांनी डेहराडूनमध्ये सभा घेतली होती. यादरम्यान त्यांनी मास्क घातला नव्हता.

केजरीवाल यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, त्यांना संक्रमणाची सौम्य लक्षणे आहेत आणि सध्या ते घरीच क्वारंटाइन झाले आहेत. केजरीवा यांनी आपल्या संपर्कात येणाऱ्या लोकांना चाचणी करुन घेण्याचे आवाहन केले आहे.

Tags: