COVID-19

२ डोस घेऊनही जिपं सीईओ दर्शन यांना कोरोना

Share

कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस घेऊनही बेळगाव जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही. यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाल्याने खळबळ उडाली आहे.

संसर्गाच्या बाबतीत कोरोना कसलाच भेदभाव करत नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. बेळगाव जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही. यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले आहे. विषयच म्हणजे त्यांनी कोरोना लशीचे दोन्ही डोस याआधीच घेतले होते. तरीही त्यांच्यात कोरोनाची सामान्य लक्षणे दिसून आल्याने त्यांनी चाचणी करून घेतल्यावर यावर शिक्कामोर्तब झाले. सध्या ते घरीच विलगीकरणात उपचार घेत आहेत. दरम्यान, बेळगावात १८ वर्षाच्या एका युवकांसह एकूण ३४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Tags: