राज्यभरात १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या कोविड लसीकरण मोहिमेला आजपासून सुरुवात झाली असून बंगळूरमध्ये आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या महत्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
१५ ते १८ वयोगटातील मुलांच्या कोविड लसीकरण मोहिमेला आजपासून सुरुवात झाली असून बेंगळूर येथे आयोजित करण्यात आलेल्या लसीकरण कार्यक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी मूडलपाळ्य भैरवेश्वर नगर च्या बीबीएमपी हायस्कुल आणि पदवीपूर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना लस देण्यात आली.
या कार्यक्रमाच्या शुभारंभानंतर मुख्यमंत्री म्हणाले, कोविड सारखी परिस्थिती उदभावेल याचा कोणीही विचार केला नव्हता. गेल्या दोन वर्षात अनेक आव्हाने आली. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योग्यवेळी योग्य निर्णय घेऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर आदर्श निर्माण केला आहे. केंद्र सरकारने राबविलेल्या विशेष योजना, निर्देश आणि लसीकरण यावर केंद्र सरकारने अभूतपूर्व काम केले आहे.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, येडियुरप्पा यांच्या काळात आलेल्या कोविड लाटेचा सामना करण्यात तसेच राज्यातील औषध, बेड आणि ऑक्सिजनचा प्रश्न यशस्वीपणे हाताळण्यात आला. इतर राज्यांच्या तुलनेत कर्नाटकमध्ये कोविडची समस्या कमी करण्यासाठी आम्ही केलेल्या कठोर उपाययोजनांमुळे हे घडले आहे. यासाठी सर्व आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि कोविड वॉरियर्सचे अभिनंदन करू इच्छितो असे मुख्यमंत्री म्हणाले.
सध्या १५ ते १८ वयोगटातील मुलांना लस देण्यात येत असून मुलांचे आरोग्य सांभाळणे अत्यंत गरजेचे आहे. राज्यातील ४ लाख ४१ हजार मुलांना लस देण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून बंगळूरमध्ये ४० हजार विद्यार्थ्यांना विविध शाळा – कॉलेजच्या माध्यमातून लस देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी मंत्री व्ही. सोमाण्णा, डॉ. के. सुधाकर, भैरती बसवराज, डॉ. सी. एन. अश्वथनारायण, आरोग्य विभागाचे कर्मचारी, विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते.
Recent Comments