COVID-19

महाराष्ट्राची बस पोलिसांनी पाठवली परत

Share

 कोविड आणि ओमीक्रॉनच्या पार्श्वभूमीवर कोगनोळी चेकपोस्टवर पोलीस डोळ्यात तेल घालून पहारा  देत आहेत. कोविड निगेटिव्ह अहवाल नसल्याच्या कारणावरून महाराष्ट्राची एक बस परत पाठवून दिल्याची घटना घडली.

राजधानी मुंबईसह महाराष्ट्रात कोविड आणि ओमीक्रॉनच्या संसर्गाची प्रकरणे वाढत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर कडक निगराणी ठेवण्यात येत आहे. काल, रविवारी रात्री निपाणीजवळील कोगनोळी चेकपोस्टवरून कोविड निगेटिव्ह अहवाल नसल्याच्या कारणावरून महाराष्ट्राची एक बस परत पाठवून दिल्याची घटना घडली. बसमधील प्रवाशांकडे आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल नसल्याने ही कारवाई करण्यात आली.

 

Tags: