COVID-19

महाराष्ट्रात कोरोना ओमीक्रॉनचा धुमाकूळ; निपाणीत पोलिसांची जागृती मोहीम

Share

महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग आणि ओमीक्रॉनचा धुमाकूळ पुन्हा वाढल्याच्या पार्श्वभूमीवर महारष्ट्र-कर्नाटक सीमेवरील खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. कोविड नियम सक्तीने पाळण्याचे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात येत आहे.

होय, महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत आहे. तशातच कोरोनाचा नवा रूपांतरित विषाणू ओमिक्रॉननेही धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे राज्याच्या सीमांवर दहशतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या सूचनेवरून निपाणीत सीपीआय संगमेश शिवयोगी यांनी जागृती मोहीम राबवली. लोकांनी नेहमी मास्क वापरावा, वेळोवेळी सॅनिटायझरने हात स्वच्छ करावेत, सामाजिक अंतर पाळावे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळावी असे आवाहन यावेळी करण्यात आले. या नियमांचा भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करू असा इशारा देण्यात आला.
जनतेतूनही पोलिसांच्या या जागृती मोहिमेचे स्वागत करण्यात आले.

Tags: