महान शिल्पकार जकणाचार्य यांची जयंती बेळगावात शनिवारी उत्साहात साजरी करण्यात आली.

बेळगावातील कट्टीमनी सभागृहात शनिवारी बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, महानगरपालिका आणि कन्नड व संस्कृती खाते यांच्या संयुक्त विद्यमाने महान शिल्पकार जकणाचार्य यांची जयंती साजरी करण्यात आली. बेळगाव उत्तरचे आ. अनिल बेनके यांच्याहस्ते दीप प्रज्वलन करून जयंती कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी आ. बेनके व उपस्थित मान्यवरांनी जकणाचार्य यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. याप्रसंगी तहसीलदार आर. के. कुलकर्णी, कन्नड व संस्कृती खात्याच्या सहायक संचालिका विद्यावती बजंत्री, उमेश पत्तार, रमेश उक्कली आदी उपस्थित होते.



Recent Comments