Belagavi

बेळगावात संयमाने, साधेपणाने नववर्षाचे स्वागत

Share

 कुंदानगरी बेळगावात नागरिकांनी नाईट कर्फ्यूमुळे शुक्रवारी रात्री संयमाने, साधेपणाने नववर्षाचे स्वागत केले. तरुणांनी आणि लहान मुलांनी ओल्ड मॅन जाळून नववर्षाचे स्वागत केले.

ओमीक्रॉनच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी राज्य सरकारने १० दिवसांसाठी रात्री १० ते सकाळी ५ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू जारी केला आहे. त्यामुळे गेल्या २ वर्षांप्रमाणेच यंदाही नववर्षाच्या स्वागतावर बंधने आली. त्यामुळे काहीशा नीरस वातावरणातच नववर्षाचे स्वागत करण्यात आले. एरव्हीप्रमाणे संगीताच्या तालावर थिरकत, पी ले पी ले म्हणत जोरदार पार्ट्याही मोठ्या प्रमाणात झाल्या नाहीत. नामांकित हॉटेल्समध्ये  पार्ट्या करून काहींनी नववर्षाचे स्वागत केले. अनेक हॉटेल्समध्ये रंगीत पार्ट्यांचे आयोजन केले होते. तेथे कुटुंबियांसह जाऊन अनेकांनी उपस्थिती लावत एन्जॉय केला.

बेळगावात नाईट कर्फ्यूमुळे न्यू ईयर सेलिब्रेशनवर मर्यादा येणार असल्यानी अनेक बेळगावकरांनी आधीच गोवा गाठले आहे. शहरातील बहुतेक सर्व चर्चमध्ये सरकारच्या नाईट कर्फ्यू आदेशाचे पालन करत रात्री दहाच्या आतच ओल्ड मॅन प्रतिकृतींचे दहन करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर अनुचित प्रकार टाळण्यासाठ बेळगाव शहर व परिसरात तगडा पाेलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Tags: